ladaki bahin yojana latest news|लाडक्या बहिणींना दिलासा…???

ladaki bahin yojana latest news, ladaki bahin yojana new update today ,ladaki bahin yojana status ,mukyamantri ladaki bahin ,ladaki bahin yojana age limit ,majhi ladaki bahin yojana

“लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण (ladaki bahin yojana status )

नाशिक, ता. १६ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुढे सुरू राहणार की नाही, याबाबत चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, ही योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ठरवलेले निकष काटेकोरपणे लागू केले जातील. चारचाकी वाहन असलेल्या किंवा मासिक वेतन २०,००० रुपयांहून अधिक असलेल्या महिलांना योजनेंतर्गत लाभ मिळणार नाही. मात्र, आधीच लाभ घेतलेल्या महिलांकडून सरकार कोणतीही रक्कम परत घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

योजनेच्या अटींबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, योजना सुरू करताना दोनहून अधिक अपत्य असलेल्या महिलांना लाभ न देण्याचा विचार होता. तसेच, घरात चारचाकी वाहन असलेल्या आणि २०,००० रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या महिलांना वगळण्याची चर्चा ‘महायुती’तील नेत्यांनी केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने सरसकट निधी वितरित करण्यात आला. निवडणुकीनंतर सरकारच्या लक्षात आले की, निकषांना न बसणाऱ्या काही महिलांनीही लाभ घेतला आहे. त्यामुळे अशा लाभार्थींना स्वयंप्रेरणेने योजना सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते, आणि त्यानंतर सुमारे पाच लाख महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतल्याचे पवार यांनी सांगितले.

गरीब महिलांसाठी योजना सुरूच राहणार…? (ladaki bahin yojana new update today)

अजित पवार यांनी स्पष्ट केले की, मजुरी करणाऱ्या, कष्टकरी तसेच घरकाम करणाऱ्या अशा महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. ज्या महिलांना इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी ही मदतीची योजना सुरूच राहणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.”

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना:-

* वय 21 ते 60 वर्षे
* दरमहा 1500 रुपये मिळणार
* दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
* अंमलबजावणी : जुलै 2024 पासून 

कोण असणार पात्र?

* महिला महाराष्ट्र रहिवासी असावी
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला असल्यास
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
* 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल (ladaki bahin yojana age limit)

अपात्र कोण असेल?

  • 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
  • घरात कोणी Tax भरत असेल तर
  • कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
  • कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
  • कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

नवीन योजनांच्या माहितीसाठी :-

ladaki bahin yojana latest news, ladaki bahin yojana new update today ,ladaki bahin yojana status ,mukyamantri ladaki bahin ,ladaki bahin yojana age limit ,majhi ladaki bahin yojana