bandhkam kamgar ,bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar, bocw maharashtra

बांधकाम कामगार कल्याणकारी योजना (bandhkam kamgar yojana )
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,सदरयोजना माहिती आपण आपल्या पोस्टच्या माध्यामतून जाणून घेण्याचा प्रयन्त करत आहोत.तरी आज रोजी आपण महाराष्ट्र सरकारची (maharashtra bandhkam kamgar)महत्वाची योजना बघणार आहोत.त्या योजनेचे नाव आहे, बांधकाम कल्याणकारी योजना आणि त्यातील सविस्तर माहिती तर चला वाचक मित्रानो आज आपण बांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या योजनेची सविस्तर माहिती आपणसदर पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊया, त्यासाठी पात्रता निकषकाय आहेत, कोणते कोणते कागदपत्रेलागणार आहेत.तसेचअर्ज कसा करायचा व कुठे करायचा ,याबद्दल आपण जाऊन घेऊया.
योजनेबाबत दुरदृष्टी
बांधकाम कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे ,धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करू देणे ,तसेच रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे .
योजनेचे मिशन
सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य, कामांची स्थिती, व्यावसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरणे / कार्यक्रम / योजना / प्रकल्प घालून आणि कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे, घातक व्यवसायापासून बाल श्रम काढून टाकणे आणि प्रक्रिया, श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकट करणे आणि कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा प्रचार करणे.
ह्या योजनेचे कार्य क्षेत्र खूप मोठे असून या योजने अतर्गत खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात असून त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगारांना (bandhkam kamgar ) होत आहे आणि योजना यशस्वी रित्या पार पाडली जात आहे .ह्या रोजाना राबवत असताना त्या वेग वेगळ्या वर्गवारी नुसार वर्ग करण्यात आल्या आहेत जसेकी सामाजिक सुरक्षा योजना , शैक्षणिक योजना इ. तरी त्या आपण पाहणारच आहोत.योजनांची गटवारी खालील प्रमाणे :-
सामाजिक सुरक्षा योजना
- नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु.३०,०००/-.
- व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप.
- नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे / अवजारे खरेदी करण्याकरिता रु.५०००/- अर्थसहाय्य
- नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.
- नोंदीत बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.
- नोंदीत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना.
शैक्षणिक योजना
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रू.२५००/- किवा इ.८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रु.५०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास रु.१०,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू.१०,०००/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रू. २०,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रू.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.६०,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी रू.२०,०००/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रु.२५,०००/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती.
Bandhkam Kamgar yojana : महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना mahabocw.in
आरोग्य विषयक योजना
- नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,०००/-
- नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रू.१,००,०००/- (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच)
- पती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत १८ वर्षापर्यंत रू.१,००,००० मुदत बंद ठेव.
- नोंदीत बांधकाम कामगारास ७५% अपंगत्व आल्यास रू.२,००,०००/- अर्थसहाय्य.
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना.
bandhkam kamgar yojana
अर्थसहाय्य योजना
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू. ५,००,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु.२,००,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू.६ लक्ष पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा रू.२ लक्ष अनुदान.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता रू. १०,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रू.२४,०००/- (५ वर्षांकरिता), (प्रति वर्षी अर्ज करणे आवश्क्य राहील).

बांधकाम कामगार योजना |bandhkam kamgar |bandhkam kamgar yojana
नोंदणी पात्रता निकष पुढीलप्रमाणे :-
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (bandhkam kamgar )
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…
- वयाचा पुरावा
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
नोंदणी फी- रू. 1/- व वार्षिक वर्गणी रू.1/-
बांधकाम कामगार योजनेबाबत असलेले प्रश्न
१. बांधकाम कामगार (bandhkam kamgar )2024 योजना काय आहे?
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना 2024 अंतर्गत बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत दिली जाते . या योजनेमुळे कामगारांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील.6 days ago
२. भारतात किती बंधपत्रित कामगार आहेत?
भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या मते, भारतात 300,000 हून अधिक बंधपत्रित मजूर आहेत, त्यापैकी बहुतांश तामिळनाडू, कर्नाटक आणि ओडिशा राज्यांमध्ये आहेत.
३. mbocww चा अर्थ काय आहे?
महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार. कल्याण मंडळ (MBOCWW).
४. कामगार कायदा का?
रोजगार कायदा या नावाने ओळखला जाणारा कामगार कायदा हा कायदे, प्रशासकीय नियम आणि उदाहरणांचा मुख्य भाग आहे जे कामगार आणि त्यांच्या संस्थांच्या कायदेशीर हक्क आणि निर्बंधांना संबोधित करतात . कामगार कायद्याच्या दोन व्यापक श्रेणी आहेत.
५. भारतात किती कामगार कायदे आहेत?
1947 च्या औद्योगिक विवाद कायद्यामध्ये भारताच्या कामगार कायद्यांमध्ये मोठे सुधारणा करण्यात आली. तेव्हापासून, अतिरिक्त 45 राष्ट्रीय कायदे 1948 च्या कायद्याचा विस्तार किंवा छेद करतात आणि आणखी 200 राज्य कायदे कामगार आणि कंपनी यांच्यातील संबंध नियंत्रित करतात.
बांधकाम कामगार योजना |bandhkam kamgar |bandhkam kamgar yojana
कोणते कामगार (bandhkam kamgar )या वरील योजनेचा लाभ घेऊ शकतात?
“बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे…
- इमारती,
- रस्त्यावर,
- रस्ते,
- रेल्वे,
- ट्रामवेज
- एअरफील्ड,
- सिंचन,
- ड्रेनेज,
- तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
- निर्मिती,
- पारेषण आणि पॉवर वितरण,
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
- तेल आणि गॅसची स्थापना,
- इलेक्ट्रिक लाईन्स,
- वायरलेस,
- रेडिओ,
- दूरदर्शन,
- दूरध्वनी,
- टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
- डॅम
- नद्या,
- रक्षक,
- पाणीपुरवठा,
- टनेल,
- पुल,
- पदवीधर,
- जलविद्युत,
- पाइपलाइन,
- टावर्स,
- कूलिंग टॉवर्स,
- ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
- दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
- रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
- गटार व नळजोडणीची कामे.,
- वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
- लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
- जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
- सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
- काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
- कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
- सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
- स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
- सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
- जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
- माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
- रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
- सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.
कार्यालय
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. 5 वा मजला, एमएमटीसी हाऊस,
प्लॉट सी-22, ई-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व),
मुंबई – 400051, महाराष्ट्र
अधिक माहितीसाठी संपर्क :-
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | (022) 2657-2631 (022) 2657-2632 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | bocwwboardmaha@gmail.com support@mahabocw.in |
पत्ता | कार्यालय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. 5 वा मजला, एमएमटीसी हाऊस, प्लॉट सी-22, ई-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051, महाराष्ट्र |
योजनेबाबत नागरिकांचे प्रश्न :-
अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून गावातील कामगारांना मिळणार हक्काचे घर…!!!
बांधकाम कामगारांच्या वैद्यकीय तपासण्या आता होणार मोफत …!!!
अटल बांधकाम कामगार आवास योजना 2025 (शहरी)
बांधकाम कामगारांना गृहपयोगी मोफत वस्तू संच वितरण 2025
बांधकाम कामगारांसाठी नवीन सूचना हे काम नाही केल तर आता अर्ज होणार नामंजूर
bandhkam kamgar ,bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar, bocw maharashtra