बांधकाम कामगार योजना ,bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration, imarat bandhkam kamgar, bocw maharashtra
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, सदर योजनेची माहिती आपण आपल्या पोस्टच्या माध्यामतून
जाणून घेण्याचा प्रयन्त करत आहोत.तरी आज रोजी आपण महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना बघणार
आहोत .त्या योजनेचे नाव आहे, बांधकाम कामगारांना 17 प्रकारच्या गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण
करण्यात येते ”, तसेच अजून बरेच काही आहे.आज आपण बांधकाम कामगारांना व त्याच्या बांधकाम कामगारांना प्रकारच्या गृहपयोगी वस्तू संच कसा मिळणाऱ या योजनेची सविस्तर माहिती आपणसदर पोस्टच्या माध्यमातून
जाणून घेऊया , त्यासाठी पात्रता निकष काय आहेत, | कोणते कोणते कागदपत्रे लागणार आहेत. तसेच
अर्ज कसा करायचा व कुठे करायचा ,याबद्दल आपण जाऊन घेऊया. सदरील योजना जास्त कामगार पर्यंत
पोहचण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महामंडळ स्थापन केले व त्या मार्फत विविध योजना राभाविल्या त्या महामंडळाचे नाव पुढील प्रमामे आहे “महाराष्ट्र शासन विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ “ वरील मंडळ नोंदीकृत कामगारांना “गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण” करत आहे. “गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण” यासाठी महाराष्ट्र सरकार ने सदर योजना महाराष्ट्र भर राभवत आहे. नोंदीत बांधकाम कामगारांना 17 प्रकारच्या गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येते.इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा
स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 10 लक्ष नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना (bandhkam kamgar yojana) गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सदर योजनेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे :-
कामगारांना गृहपयोगी भांड्यांचे मोफत वाटप करणे.
कामगारांचे जीवनमान सुधारणे.
कामगारांना मिळणाऱ्या वस्तूंची यादी खालील प्रमाणे :-
१. ताट 04
२. वाटया 08
३. पाण्याचे ग्लास 04
४. पातेले झाकणासह 01
५. पातेले झाकणासह 01
६. पातेले झाकणासह 01
७. मोठा चमचा (भात वाटपाकरीता) 01
८. मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) 01
९. पाण्याचा जग (2 लीटर) 01
१०. मसाला डब्बा (7 भाग) 01
११. डब्बा झाकणासह (14 इंच) 01
१२. डब्बा झाकणासह (16 इंच) 01
१३. डब्बा झाकणासह (18 इंच) 01
१४. परात 01
१५. प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील) 01
१६. कढई (स्टील) 01
१७. स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह 01
एकूण 30
सदर योजनेसाठी शासननी महत्वाचे मुद्दे तयार करून नोदणी कृत बाधकाम कामगारांना योग्य व
उत्तम वस्तूचा संच मिळावा या साठी पुढील मुद्दे तयार केले आहेत.
वाटप संबंधित महत्वाचे मुद्दे :-
1 नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय bandhkam kamgar nondaniआहे) यांना गृहपयोगी
वस्तू संच पुरविण्याबाबत ई-निविदा पध्दतीचा अवलंब करावा व नोंदणीकृत, नामांकित व
अनुभवी संस्थेची निवड करावी.
2 गृहपयोगी वस्तू संचाची निविदा स्विकृत करण्यापूर्वी गृहपयोगी वस्तू संचामधील वस्तूंच्या दर्जाची
शासन मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करुन घ्यावी.
3 वस्तू व सेवाकर (GST) वगळता पॅकिंग, पुरवठा, वाहतूक, साठवणूक, विमा, वितरण,
बायोमॅट्रीक, फोटो, मनुष्यबळ पुरवठा इत्यादी सर्व खर्चाचा गृहपयोगी वस्तू संचाच्या दरामध्ये
समावेश राहील.
4 गृहपयोगी वस्तू संचातील वस्तूंवर मंडळाचे नाव नक्षीदारपणे व कोरीव होणे (Embossing/
Laser Engraving) अनिवार्य आहे.
5 नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांना गृहपयोगी
वस्तू संच प्राप्त झाल्यावर सरकारी कामगार अधिकारी (उपजिल्हा कार्यकारी अधिकारी,
मइवइबाकमं) हे कामगार उप आयुक्त (उप मुख्य कार्यकारी अधिकारी) यांना
पोचपावती सादर करतील. कामगार उपआयुक्त यांनी सरकारी कामगार अधिकारी यांचेकडून
पोचपावती प्राप्त झाल्यावर देयकाची अदायगी करण्याच्या प्रमाणपत्रासह महाराष्ट्र इमारत व इतर
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांना अहवाल सादर करावा. कामगार उपआयुक्त (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मइवइबाकमं) यांचेकडील प्रमाणपत्रासह अहवाल प्राप्त झाल्यावर
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ देयकाची अदायगी करेल.
6 गृहपयोगी वस्तू संच वितरीत करताना नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची
नोंदणी सक्रिय आहे) यांचे छायाचित्र काढणे व बायोमॅट्रीक पध्दतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य
राहील.
7 गृहपयोगी वस्तू संच वितरणाकरीता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाचे शिबीर
(Camp) आयोजित करण्यात येतील.
8 गृहपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही मंडळाने विहित केलेल्या कालावधीत पूर्ण
करावी. पुरवठयाचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याचे अधिकार मंडळास राहतील.
9 गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेसाठी येणारा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीमधून
भागविण्यात यावा ( bandhkam kamgar yojana).

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना फायदा:-
1. कामगारांना भांडी खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्यांच्या
पैशांची बचत होईल.
2. कामगारांना चांगल्या दर्जाची भांडी मोफत दिली जातील.
नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थीं
महाराष्ट्रात इमारत व बांधकाम मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना.
नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना आवश्यक पात्रता :-
1. अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
2. कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
3. अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम
केलेले असणे आवश्यक आहे.
4. तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अटी व शर्ती :-
1. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला
बांधकाम कामगार (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) या योजनेचा लाभार्थी राहील.
2 .नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांनी विहीत
नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त (जिल्हा कार्यकारी अधिकारी,
मइवइबाकम)/ सरकारी कामगार अधिकारी (उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, मइवइबाक
यांचेकडे भरून दिल्यानंतर गृहपयोगी वस्तू संच पुरविण्यात येतील.
3 .जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त (जिल्हा कार्यकारी अधिकारी,
)/सरकारी कामगार अधिकारी (उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, )
योजनेचे समन्वय अधिकारी (नोडल अधिकारी) राहतील.
4 .योजनेअंतर्गत सायकल चा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे :-
1. आधार कार्ड
2.पॅन कार्ड
3.रहिवाशी दाखला
4.90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
5.कायमचा पत्ता पुरावा
6.ई-मेल आयडी
7.मोबाईल नंबर
8.काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
9.नोंदणी अर्ज
10. पासपोर्ट आकारातील 3 फोटो
11.बँक पासबुक झेरॉक्स
12.जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
13.घोषणापत्र
अर्ज करण्याची पद्धत :-
कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या
क्षेत्रातील (bandhkam kamgar) कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
बांधकाम कामगार योजनेबाबत विचारले जाणारे प्रश्न :-
1. बांधकाम कामगार (bandhkam kamgar) अर्ज किती दिवसात मंजूर होतो?
हे ९० दिवसाचे प्रमाण पत्र खूप महत्त्वाचे आहे . जर तुमच्या कडे ९० दिवसाचे प्रमाण पत्र नसेल तर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी किवा नूतनी कारण करू शकणार नाही . या 90 दिवसाच्या प्रमाणपत्र मध्ये माहिती व्यवस्थित भरले तरच आपल्या अर्ज मंजूर होतो नाहीतर काहीतरी त्रुटी येऊन 100% रिजेक्ट होऊ शकतो .
2. कामगार संघटनेच्या नोंदणीसाठी अर्ज करण्यासाठी किती सदस्यांची आवश्यकता आहे?
युनियनच्या सतत नोंदणीसाठी कोणत्या आवश्यकता आहेत? कामगारांच्या नोंदणीकृत ट्रेड युनियनमध्ये प्रत्येक वेळी 10% किंवा 100 कामगार यापैकी जे कमी असेल, किमान 7 व्यक्ती एस्ट किंवा उद्योगात गुंतलेल्या किंवा कामावर असतील, ज्याच्याशी ते जोडलेले असेल, असे चालू ठेवावे. त्याचे सदस्य.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | (022) 2657-2631 (022) 2657-2632 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | bocwwboardmaha@gmail.com support@mahabocw.in |
पत्ता | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. 5 वा मजला, एमएमटीसी हाऊस, प्लॉट सी-22, ई-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051, महाराष्ट्र |
अधिक महत्वाचे :-
१. आता सरकार देणार सगळ्यांना मोफत वीज सुविधा माहितीसाठी वाचा
२. बांधकाम कामगार नोंदणी कशी आणि कोण करू शकते ? पुढे वाचा
३.शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 9 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार रु.75,000 ते 1,25,000 हजार शिष्यवृत्ती
४ . महिलांच्या नावावर गॅस जोडणी असणाऱ्यांना 3 सिलेंडर मोफत.!!!
५.व्यवसायासाठी हवेत १० लाख तर त्वरित अर्ज करा ….