bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar, bocw maharashtra
बांधकाम कामगरांसाठी एक आनंदाची तसेच एक सूचना असून त्याचे पालन नाही झाले तर बांधकाम कामगारांचे अर्ज नामंजूर केले जाणार आहेत तरी याची जाहीर सूचना मंडळातर्फे करण्यात आली असून याची माहिती या माहितीद्वारे आपण घेणार आहोत तरी माहितीसाठी खाली दिलेली सूचना वाचावी. बांधकाम कामगारांच्या FORM नव्याने भरणे सुरु झाले आहेत तसेच ज्यांचे अर्ज नुतानिकारायचे आहेत त्यांनी हि ह्या अर्जाकडे बारकाईने माहिती घेऊन योग्यती पावले उचलावीत आणि त्याप्रमाणे सगळी कागदपत्रे जमा करून खाली दिल्या नुसार त्या OFFICE मध्ये जाऊन ती जमा करावीत. कागदपत्रांची यादी खाली नमूद केलेली आहे तरी याची नोंद घ्यावी.
बांधकाम कामगार योजनेची उद्देश आणि उद्दीष्टे :-
(maharashtra bandhkam kamgar)
- ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण.
- बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करणे.
- लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत सुलभपणा आणणे.
- कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
- लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
- बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
- कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
- प्रत्येक बांधकाम कामगाराला एकमेव नोंदणी क्रमांक देणे.
- नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया.
- कल्याणकारी योजनांच्या व्यवस्थापनासाठी प्रगत विश्लेषण.
नवीन शासन निर्णय खालीलप्रमाणे :-
मंडळाच्या आदेशानुसार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एन्ट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज online पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. ६ फेब्रुवारी २०२५ पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर रहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील.
लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबतः
ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात.
कोणते बांधकाम कामगार नोंदणी करू शकतो?
(bandhkam kamgar nondani)
- इमारती बांधकामामध्ये काम करणारे कामगार .
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह काम करणारे कामगार .
- निर्मिती क्षेत्रातील कामगार .
- रस्त्यावर काम करणारे कामगार .
- रस्ते बांधणी / दुरुस्तीचे काम करणारे कामगार .
- रेल्वे मध्ये काम करणारे काम करणारे कामगार .
- ट्रामवेज कामगार .
- एअरफील्ड कामगार .
- सिंचन करणारे कामगार .
- ड्रेनेज क्षेत्रातील कामगारटनेल निर्माण क्षेत्राशी निगडित कामगार .
- पुल निर्माण क्षेत्राशी निगडित कामगार .
- पदवीधर कामगार .
- तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स कामगार .
- नद्या क्षेत्राशी निगडित कामगार .
- रक्षक क्षेत्रातील कामगार .
- पारेषण आणि पॉवर वितरण मधील कामगार .
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करनारे कामगार .
- तेल आणि गॅसची स्थापना कामगार .
- इलेक्ट्रिक लाईन्स कामगार .
- वायरलेस क्षेत्रात काम करणारे कामगार .
- रेडिओ क्षेत्रात काम करणारे कामगार .
- दूरदर्शन क्षेत्रातील कामगार .
- दूरध्वनी क्षेत्रातील कामगार .
- टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स .
- डॅम क्षेत्रातील कामगार .
- नद्या क्षेत्राशी निगडित कामगार .
- रक्षक क्षेत्रातील कामगार .
- पाणीपुरवठा क्षेत्रातील कामगार .
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे .
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे .
- उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे .
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे .
- जलविद्युत क्षेत्राशी निगडित कामगार .
- पाइपलाइन क्षेत्राशी निगडित कामगार .
- टावर्स क्षेत्राशी निगडित कामगार .
- कूलिंग टॉवर्स क्षेत्राशी निगडित कामगार .
- ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य .
- दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे .
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे .
- रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम .
- गटार व नळजोडणीची कामे .
- वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे .
- स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.
- सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे .
- लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे .
- कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणारे कामगार .
- सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे .
- जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे .
- माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे .
- रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी काम करणारे कामगार .
- सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकामजलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे .
- सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम .
- काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.

नोंदणी पात्रता निकष
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:-
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…
- वयाचा पुरावा
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
नोंदणी फी- रू. 1/- व वार्षिक वर्गणी रू.1/-
योजनेबाबत प्रश्न :-
१. बांधकाम कामगार योजना किती आहेत?
सविस्तर योजनाची माहिती जाणून घेण्यासाठी इथे click करा.
२. महाराष्ट्रात कामगार कल्याण निधीसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी पाच किंवा अधिक कर्मचारी असलेल्या सुविधांना लागू होतो. नियोक्त्यांनी दर सहा महिन्यांनी निधीमध्ये पैसे भरणे आवश्यक आहे. या निधीमध्ये नियोक्ते आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात .
३. कामगार योजनेचे काय फायदे आहेत?
आपत्कालीन मदत: अपघात, आजार, मृत्यू इत्यादींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण. वैद्यकीय सुविधा: रुग्णालये, औषधे आणि आरोग्य विमा यांसारख्या आरोग्य सुविधांमध्ये प्रवेश. शिक्षण: कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण सहाय्य. निवास: कामगारांसाठी स्वस्त निवास सुविधा.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | (022) 2657-2631 (022) 2657-2632 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | bocwwboardmaha@gmail.com support@mahabocw.in |
पत्ता | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. 5 वा मजला, एमएमटीसी हाऊस, प्लॉट सी-22, ई-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051, महाराष्ट्र |
नवीन योजनांच्या माहितीसाठी :-
1.घर खरेदीसाठी सरकारकडून पैसे हवेत तर लवकर फॉर्म भरा
2.झटक्यात लखपती व्हा… ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा लाभ कसा मिळवाल ? ही कागदपत्रं आहेत का? तपासा….सरकार देणार प्रशिक्षणासाठी अनुदान आणि रोज ५०० रुपये
3.शेतकऱ्याच्या जमिनीवर कायदेशीर अधिकार मिळवून देणारी स्वामित्व योजना…….
bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar, bocw maharashtra