भारतातील या सरकारी योजनांमध्ये मिळेल पूर्णतः मोफत शिक्षण – कोणतेही शुल्क लागणार नाही! जाणून घ्या आवश्यक माहिती आणि कागदपत्रे
Girls free education in maharashtra latest news ,free government courses for ladies ,Free education for girl in Maharashtra eligibility criteria
भारतातील शिक्षणव्यवस्थेचा प्रवास: सामाजिक क्रांती ते बाजारीकरण
प्राचीन भारतीय चातुर्वण्य व्यवस्थेत शिक्षण ही उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती, ज्यामुळे स्त्रिया , शूद्र आणि अतिशूद्र तब्बल पाच हजार वर्षे शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहिले. विद्यमान सामाजिक व्यवस्थेने त्यांच्या ज्ञानाला मान्यता दिली नाही, त्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहिले. मात्र, १९व्या शतकातील प्रबोधन काळात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, छत्रपती शाहू महाराज, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, सर सय्यद अहमद खान, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद यांसारख्या समाजसुधारकांनी शिक्षणाच्या क्रांतीस प्रारंभ केला. “सर्वांसाठी समान शिक्षण” हा विचार स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी आला आणि पुढे तो भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला.
शिक्षण: एक सार्वत्रिक हक्क ते बाजारीकरण
भारतीय राज्यघटनेने समता, सामाजिक न्याय, बंधुता आणि लोकशाही या मूलभूत मूल्यांचा स्वीकार केला. शिक्षण ही केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अत्यावश्यक बाब आहे, असे मान्य करण्यात आले. त्यामुळे शिक्षणाला ‘सार्वजनिक संसाधन’ म्हणून महत्त्व देण्यात आले. १९४८ ते १९८० या काळात शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के निधी खर्च करावा, शिक्षण सर्वांसाठी मोफत (Girls free education in maharashtra latest news )असावे आणि हे सरकारचे नैतिक व घटनात्मक कर्तव्य आहे, अशी धोरणे राबवण्यात आली.
मात्र, १९८० नंतरच्या काळात जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाच्या लाटेमुळे शिक्षणाच्या मूलभूत तत्त्वांमध्ये मोठा बदल झाला. ‘गॅट करार’ आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या दबावामुळे समाजवादी विचारसरणी मागे पडली आणि शिक्षणाला बाजारपेठेच्या चौकटीत बसवले गेले.
शिक्षणाचे व्यापारीकरण आणि त्याचे परिणाम
पूर्वी जिथे शिक्षणाला सार्वजनिक हक्क मानले जात होते, तिथे आता ते एक ‘खासगी उत्पादन’ म्हणून पाहिले जात आहे. शैक्षणिक संस्था व्यावसायिक उद्योजकांच्या हाती गेल्या असून, त्यांचे स्वरूप ‘शैक्षणिक मॉल’ असे झाले आहे. शिक्षक ज्ञानदाते न राहता विक्रेते बनले आहेत आणि विद्यार्थी तसेच पालक ग्राहक बनले आहेत. पैसा असेल तर शिक्षण उपलब्ध आहे, अन्यथा नाही, असे बाजारीकरणावर आधारित नवे शैक्षणिक तत्त्वज्ञान भारतात रुजू होत आहे.
यामध्ये शासन संस्था केवळ प्रेक्षकाची भूमिका घेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारे शिक्षण क्षेत्रातून माघार घेत असून, शिक्षणाचा बोजा खासगी भांडवलदारांच्या हाती सोपवण्यात आला आहे. परिणामी, शिक्षण ही सुविधा निवडक आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांसाठी मर्यादित राहू लागली आहे. शिक्षण हा लोकशाहीचा आत्मा असताना, त्याचे बाजारातील एक वस्तू म्हणून रूपांतर होणे हे सामाजिक समतेसाठी मोठे आव्हान आहे.
Girls free education in maharashtra latest news ,free government courses for ladies ,Free education for girl in Maharashtra eligibility criteria
शिक्षणाचे भवितव्य: समाजहित कि व्यवसायिक नियंत्रण?
आजच्या परिस्थितीत शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार राहिला नसून तो एक आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामुळे शिक्षणाला परत एकदा सार्वत्रिक हक्क म्हणून मान्यता देणे, सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेला बळकट करणे आणि शैक्षणिक संधी सर्वांसाठी खुल्या करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा, शिक्षण क्षेत्रावरील भांडवलशाहीचा कब्जा अधिक वाढत जाईल आणि संधींचे दार गरीब व मध्यमवर्गीयांसाठी कायमचे बंद होण्याचा धोका निर्माण होईल.
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे
शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. कोणत्याही विद्यार्थ्याने आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारे विविध उपक्रम व योजना राबवतात. या योजनांद्वारे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती, पुस्तकं, गणवेश आणि इतर सुविधा दिल्या जातात. बहुतेक सरकारी योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहेत, जेणेकरून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकेल.
भारतामध्ये मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती योजनांचे प्रकार
भारतात एक नव्हे, तर अनेक मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे, ज्या अंतर्गत विद्यार्थी शालेय शिक्षण पूर्ण करू शकतात. मात्र, योग्य माहितीच्या अभावामुळे अनेकांना या योजनांचा लाभ घेता येत नाही. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी सरकारी मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेऊ इच्छित असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. येथे अशा काही सरकारी योजनांची माहिती दिली आहे ज्या विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न भरता शिक्षण घेण्याची संधी प्रदान करतात.
भारतामधील प्रमुख सरकारी मोफत शिक्षण योजना :-
Girls free education in maharashtra latest news
1. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना
भारत सरकारने 2015 साली ही योजना सुरू केली. मुख्य उद्देश घटत्या स्त्री-पुरुष प्रमाणावर नियंत्रण आणणे आणि मुलींच्या शिक्षणास व सशक्तीकरणास प्रोत्साहन देणे हा आहे. ही योजना मुख्यतः उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, बिहार आणि दिल्लीमध्ये राबवली जाते.
2. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना
2004 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत 10 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींना शैक्षणिक मदत दिली जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थिनींना निवासी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.
3. समग्र शिक्षा अभियान
ही योजना शिक्षणासंबंधी व्यापक योजना मानली जाते, ज्यामध्ये SSA, RMSA आणि शिक्षक शिक्षण (TE) यांचा समावेश आहे. समग्र शिक्षा योजनेचा उद्देश प्री-स्कूल ते 12वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आहे. डिजिटल शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षणावर या योजनेत भर दिला जातो.
4. CBSE उडान योजना
मानव संसाधन विकास मंत्रालयाने सुरू केलेली ही योजना मुलींच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी आहे. 11वी व 12वी वर्गातील विद्यार्थिनींना विनामूल्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन दिले जाते. तसेच, ऑनलाईन कोचिंग, अभ्यास साहित्य आणि प्री-लोडेड टॅब्लेटही दिले जाते.
5. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (RMSA)
या योजनेचा उद्देश माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आणि शिक्षणाची सहज उपलब्धता वाढवणे आहे. प्रत्येक गावी योग्य अंतरावर माध्यमिक शाळा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो.
6. सुकन्या समृद्धी योजना
ही योजना मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी पालकांना बचत करण्यास मदत करणारी आहे. या योजनेच्या मदतीने अनेक मुलींना शिक्षणाचा समान अधिकार मिळतो.

भारतातील अजून काही प्रमुख सरकारी मोफत शिक्षण योजना खालीलप्रमाणे आहेत:-
- समग्र शिक्षा योजना
- राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
- जवाहर नवोदय विद्यालय
- केंद्रीय विद्यालय
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण शिष्यवृत्ती
- पीएम शिष्यवृत्ती योजना
समग्र शिक्षा योजना
- ही योजना प्री-स्कूल ते बारावीपर्यंतच्या शालेय शिक्षणासाठी आहे.
- ही योजना शालेय शिक्षणाला सातत्य मानते.
- ही योजना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या शिफारशींशी सुसंगत आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
- माध्यमिक स्तरासाठी दृष्टिकोण आणि धोरण.
- गुणवत्ता, समता, संस्थांतर्गत सुधारणा आणि स्रोत संस्थांचे सुदृढ़ीकरण.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण शिष्यवृत्ती
- ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
- 40% किंवा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते.
पीएम शिष्यवृत्ती योजना या योजनेत निवडलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम मिळते.
योजनेसाठी अटी (Free education for girl in Maharashtra eligibility criteria) :-
महाराष्ट्रात, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळते. यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
- विद्यार्थिनीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणे
- विद्यार्थिनी EWS, SEBC, किंवा OBC गटातून असणे
- विद्यार्थिनी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणारी असणे
या योजनेअंतर्गत, विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाचे शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत मिळते. ही योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू आहे.
मोफत शिक्षण योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे
फक्त केंद्र सरकारच नव्हे, तर विविध राज्य सरकारेही मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी करतात. खालील कागदपत्रे या योजनांसाठी आवश्यक असू शकतात:
✔ जन्म प्रमाणपत्र
✔ आधार कार्ड
✔ रहिवासी प्रमाणपत्र
✔ पालकांचा उत्पन्न प्रमाणपत्र
✔ रेशन कार्ड
प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे निकष लागू असतात, त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहिती घेण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न असतील, तर आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आम्ही तुम्हाला योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करू.
नवीन योजनांच्या माहितीसाठी :-
सर्व विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती / scholarship पहा पात्रता
बांधकाम काम करणाऱ्या पाल्यांना मिळणार 5,000(पाच हजार) ते 1,00,000/-(एक लाख) शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती
अपंग व्यक्तींसाठी योजना आणि सुविधा
Girls free education in maharashtra latest news ,free government courses for ladies ,Free education for girl in Maharashtra eligibility criteria