todays horoscope vogue|आजचे राशिभविष्य |Today’s horoscope in marathi

दैनिक राशि भविष्य (Daily horoscope in marathi)
आजच्या राशि भविष्य मध्ये आपल्याला आजच्या दिवसात आपणास कुठल्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे आणि कुठल्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे या विषयी माहिती देते. काय आजचा दिवस तुमचा प्रगतीपथावर नेईल की, आपल्या समोर बाधा उभी करू शकते. हे जाणून घेण्यासाठी चला, तर मग पाहूया काय म्हणतात आपले तारे!
प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो, आजचा तुमचा दिवस तुमच्या मनासारखा जाण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार का हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे ज्योतिषशास्त्र अभ्यासकांकडून तुमचा आजचा दिवस कसा हे राशीभविष्यच्या (today Horoscope ) माध्यमातून सांगितलं जातं.
- आजचे पंचांग
- दिनांक : 5 डिसेंबर 2024
- वार : गुरुवार
- माह : मार्गशीर्ष
- ऋतु : हेमंत
- आयन : दक्षिणायन
- पक्ष : शुक्ल
- तिथी : चतुर्थी तिथी (दुपारी 12:49 पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
- नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (सायंकाळी 05:26 पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
- योग : वृद्धि योग (दुपारी 12:27 पर्यंत) त्यानंतर ध्रुव योग
- करण : विस्ती भद्रा करण (दुपारी 12:49 पर्यंत) त्यानंतर भाव करण
- चंद्र राशी : मकर राशी
- सूर्य राशी : वृश्चिक राशी
- राहु काळ : दुपारी 01:52 ते दुपारी 03:14 पर्यंत
- सूर्योदय : सकाळी 06:59
- सूर्यास्त : सायंकाळी 05:59
- संवत्सर : क्रोधी
- विक्रम संवत: 2081 विक्रम संवत
- शक संवत: 1946 शक संवत

मेष– एक नवीन विश्व तुमच्यासाठी खुले झाले आहे असे वाटेल. नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. नशिबाचा निर्णय तुमच्या बाजूने राहील. आत्मविश्वासाने वाटचाल सुरू राहील, धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. लोकांची चांगली साथ राहील. मनोबल उत्तम असणार आहे. सकारात्मक राहणार आहात. आरोग्य उत्तम असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाच्या कामासाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे.

वृषभ – महत्त्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहील. इतरांच्या भानगडीत पडू नका. आपण भले की आपले काम भले असे धोरण ठेवा. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. कुणाला आश्वासन देऊन शब्दात अडकून पडू नका. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपली कामे रखडणार आहेत. कामाचा व्याप कमी असणार आहे. आपल्याला अस्वस्थता असल्याने आपली आज चिडचिड होणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे.
today’s horoscope vogue|आजचे राशिभविष्य |Today’s horoscope in marathi

मिथुन– ग्रहमाताची अंनुकूलता तुमच्या बाजूने राहील, रेंगाळत पडलेली कामे गती घेतील. मात्र, त्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील, मनात सकारात्मक विचार राहतील. मनोबल उत्तम राहील. अनेक कामांसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. काहींना मानसिक प्रसन्नता देणारी घटना अनुभवण्यास मिळेल. प्रवास सुखकर होतील.

कर्क– अति आत्मविश्वास नको. जमिनीवर उभे राहून विचार करा. तब्येतीकडे दुर्लक्ष करता कामा नये. लोकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. कुणाच्या प्रश्नात मध्यस्थी करणे, कुणाची हमी घेणे, • असे प्रकार टाळले पाहिजेत. आराम आणि आहार याकडे लक्ष द्या. : मानसिक नैराश्य राहील. काहींना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी असल्याने दैनंदिन कामे रखडणार आहेत. प्रवास आज नकोत.
today’s horoscope vogue|आजचे राशिभविष्य |Today’s horoscope in marathi

सिंह– प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील.अडचणी दूर होतील. त्यामुळे तुम्हाला हलके हलके वाटेल. व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी वेळ द्याल. एकंदरीत ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. कानावर चांगल्या बातम्या पडतील. काहींना आज विविध लाभ होतील. जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने आनंदी होणार आहात. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुमच्या आरोग्याच्या समस्या कमी होतील. प्रवास सुखकर होतील.

कन्या– कार्यक्षेत्रात तुमच्या योग्यतेची सदखल घेतली जाईल. चांगले पंद व प्रतिष्ठा प्राप्त होईल. आपला दृष्टिकोन थोडा सकारात्मक ठेवण्याची गरज आहे. व्यवसायात “भरभराट होईल. मालाची विक्री चांगली होईल. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. तुमच्या महत्त्वाच्या कामांकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम असणार आहे. आर्थिक कामासाठी अनुकूलता लाभेल. . दैनंदिन कामे सहजपणे पार पडणार आहेत. काहींना अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात. आत्मविश्वासपूर्वक कामे यशस्वी करणार आहात.
today’s horoscope vogue|आजचे राशिभविष्य |Today’s horoscope in marathi

तूळ– मालमत्तेच्या व्यवहारात तुमचा फायदा होईल.वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. हाती पैसा खेळता राहील. अनेक उत्तम लाभ होतील. मात्र, आर्थिक निर्णय घाईघाईत घेण्याचा मोह आवरा. तुमचे मनोबल आज विशेष असणार आहे.

वृश्चिक– महत्त्वाची कामे झटपट आटोपून घ्या. कामे करण्यात चालढकल करू नका. लोक तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील, व्यवसायात नवीन प्रयोग करून पाहिले जातील. मौजमजा कराल. आर्थिक कामांना आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. काहींना मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक जीवनात अनुकूल वातावरण तयार होईल. सुसंवाद राहील. मनोबल वाढेल.

धनू– तुम्हाला ग्रहमानाची चांगली साथ मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. सोप्या पद्धतीने कामे होतील. मित्र- मैत्रिणींच्या भेटी होतील, त्यांच्या समवेत मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. अनेक दृष्टीने आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे.मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तर काहींना एखादी आनंददायी घटना अनुभवता येणार आहे.
today’s horoscope vogue|आजचे राशिभविष्य |Today’s horoscope in marathi

मकर– महत्त्वाची कामे पुढे ढकलणे योग्य राहील. नाही तर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खर्च होईल. चिडचिड करणे टाळा. मनात सकारात्मक विचार ठेवा. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. एखादे प्रेरणादायी पुस्तके वाचून काढा. वेळापत्रक पाळा. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. एखाद्या बाबतीत तुमची अकारण चिडचिड होणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामास विलंब लागणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ – ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल, सोप्या पद्धतीने यश मिळेल. पैशाचा ओघ सुरू राहील. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. चांगल्या संधी मिळतील, मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. : आर्थिक कामांसाठी अनुकूलता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्हाला अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. प्रवास सुखकर होतील.
today’s horoscope vogue|आजचे राशिभविष्य |Today’s horoscope in marathi

मीन – स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. कानावर चांगल्या बातम्या पडतील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील.एखाद्या प्रकल्पात व्यस्त राहाल. : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम असणार आहे. सार्वजनिक कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. प्रतिष्ठा वाढेल. प्रसन्नता लाभणार आहे.
हे राशि भविष्य नाव राशिच्या अनुसार आहे की जन्म राशि अनुसार?
Astrologist विशेषज्ञ ज्योतिषांचे म्हणणे आहे की, दैनिक राशि भविष्य जन्म राशी अनुसार पाहणे उत्तम राहील. जर तुम्हाला आपली जन्म राशी माहिती नसेल तर तुम्ही आपल्या नाव राशीच्या अनुसार ही आपले भविष्य पाहू शकतात. जुन्या काळात तसे ही “नाव” हे राशीच्या हिशोबानेच ठेवले जात होते. बऱ्याच पंडितांचे मानणे आहे की, नाव राशी, जन्म राशीच्या बरोबरच महत्वपूर्ण आहे.
माझी रास काय आहे – कसे जाणून घ्यावे?
जर तुम्हाला आपली राशि माहिती नाही किंवा आपली राशि तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे तर, तुम्ही Astrologistच्या राशि कॅलकुलेटरचा https://www.drikpanchang.com/utilities/horoscope/hindu-moonsign-calculator.html वापर करून आपल्या राशीने जाणून घेऊ शकतात. आपली राशि जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या जन्म तारखेची गरज पडेल. राशि कॅलकुलेटर ने न फक्त तुम्ही राशि जाणून घेऊ शकतात तर आपले नक्षत्र, कुंडली, ग्रह स्थिती व दशा इत्यादी खूप काही जाणून घेऊ शकतात.

today’s horoscope vogue|आजचे राशिभविष्य |Today’s horoscope in marathi
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)