vogue horoscope today|आजचे राशिभविष्य |Weekly horoscope in Marathi|

दैनिक राशि भविष्य (Daily horoscope in marathi)
आजच्या राशि भविष्य मध्ये आपल्याला आजच्या दिवसात आपणास कुठल्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे आणि कुठल्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे या विषयी माहिती देते. काय आजचा दिवस तुमचा प्रगतीपथावर नेईल की, आपल्या समोर बाधा उभी करू शकते. हे जाणून घेण्यासाठी चला, तर मग पाहूया काय म्हणतात आपले तारे!
प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो, आजचा तुमचा दिवस तुमच्या मनासारखा जाण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार का हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे ज्योतिषशास्त्र अभ्यासकांकडून तुमचा आजचा दिवस कसा हे राशीभविष्यच्या (today Horoscope ) माध्यमातून सांगितलं जातं.
आजचे राशी भविष्य मंगळवार, दि. ४ डिसेंबर २०२४
आजचे पंचांग दिनांक : 4 डिसेंबर 2024 वार : बुधवार माह : मार्गशीर्ष
ऋतु : हेमंत , आयन : दक्षिणायन ,पक्ष : शुक्ल
तिथी : तृतीया तिथी (दुपारी 01:10 पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : पूर्वाषाढा नक्षत्र (सायंकाळी 05:14 पर्यंत) त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र
योग : गण्ड योग (दुपारी 01:55 पर्यंत) त्यानंतर वृद्धि योग
करण : गराजा करण (दुपारी 01:10 पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : धनु राशी (रात्री 11:19) त्यानंतर मकर राशी
सूर्य राशी : वृश्चिक राशी , राहु काळ : दुपारी 12:29 ते दुपारी 01:51 पर्यंत
सूर्योदय : सकाळी 06:59 , सूर्यास्त : सायंकाळी 05:59
संवत्सर : क्रोधी ,विक्रम संवत: 2081 विक्रम संवत ,शक संवत: 1946 शक संवत
vogue horoscope today|आजचे राशिभविष्य |Weekly horoscope in Marathi|

मेष –
राशीमधील अनेकअडचणी दूर होतील. नवीन शिकण्यासाठी वेळ द्यावा . भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. समाजात तुमचा मान वाढेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नवीन उपयुक्त माहिती कळेल. उत्साह व उमेद वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वासाने कार्यरत राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक ताकद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे.व्यवसायात बरेच काही चांगले बदल होतील. नोकरदार वर्गाला सहानुभूती मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व राहील. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टींत मन रमेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ-
महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. ज्येष्ठांचा सल्ला घ्या.. व्यवसायातील उलाढाल वाढेल. नोकरदार वर्गाचा कामाचा व्याप वाढेल. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात श्रेय मिळेल. मानसिकता काही प्रमाणात नकारात्मक असणार आहे. तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडल्याने तुमचे मन नाराज राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी.

मिथुन-
व्यवसायात नवीन संधी चालून येईल.मनात सकारात्मक विचार राहतील. अनेक अडचणी दूर होतील. लोक तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येतील. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. काहींना जवळचा प्रवास घडून येईल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामे यशस्वीपणे पार पाडणार आहात. आरोग्य सुधारेल. गेले दोन दिवस असणारी मानसिक अस्वस्थता कमी होईल.
vogue horoscope today|आजचे राशिभविष्य |Weekly horoscope in Marathi|

कर्क –
अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. इतरांच्या भानगडीत लक्ष देण्याऐवजी आपले स्वतःचे प्रश्न आधी सोडवा. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीची चांगली साथ राहील. कामे झालीच पाहिजेत, असा अट्टहास नको. खर्च वाढणार आहेत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील, प्रवास आज नकोत. एखादी मनस्तापदायक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. महत्त्वाची कामे आज नकोत.

सिंह-
मनात आत्मविश्वास राहील. तुमच्या प्रियजनांशी तुम्ही वार्तालाप करू शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहींना विविध लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. आनंदी व आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. अनेक प्रलंबित कामे आटोक्यात येतील. तुमच्या भरगच्च कार्यक्रमांच्या यादीतून स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित कराल.
vogue horoscope today|आजचे राशिभविष्य |Weekly horoscope in Marathi|

कन्या–
नोकरीत नवीन प्रकल्पासाठी.तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यामुळे तुमचा कामाचा ताण वाढेल. मात्र, वेळेचे नियोजन नीट करा. त्यामुळे प्रगतीला चालना मिळेल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मानसिक ताकद वाढेल. तुम्ही आज विशेष आशावादी असणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्यावर असणारा ताण कमी होणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.

तूळ–
धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. व्यवसायात भरभराट होईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. मोठी गुंतवणूक’ करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
vogue horoscope today|आजचे राशिभविष्य |Weekly horoscope in Marathi|

वृश्चिक-
महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल.लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. थोरामोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल. पैशाचा ओघ सुरू राहील. मनात आत्मविश्वास राहील. त्यामुळे मोठे प्रकल्प राबविण्याचे मनात येईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. आर्थिक कामे पूर्ण होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

धनु –
तुमच्या अडचणी कमी होतील.आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण कराल, त्यासाठी तुम्हाला लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. मनात आनंदी विचार राहतील. गेले दोन दिवस असणारी मानसिक अस्वस्थता आज कमी होणार आहे. आरोग्य सुधारणार आहे. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.
vogue horoscope today|आजचे राशिभविष्य |Weekly horoscope in Marathi|

मकर-
संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल.एखादे काम रेंगाळत पडेल. एखादे महत्त्वाचे काम यशाच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल. ते काम झाले नाही तरी संयम बाळगण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवास टाळावेत. वाहने चालविताना काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहार जपून करावेत. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही.

कुंभ –
जे जे ठरवाल ते ते सिद्धीस जाईल.तुमच्यावर धनलक्ष्मीची कृपा राहील. मित्रमैत्रिणींच्या भेटी होतील. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. प्रगतीसाठी अनुकूल स्थिती राहील. काहींना विविध लाभ होतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आता हळूहळू तुमची तुमच्या आकांक्षापूर्तीकडे वाटचाल सुरू होणार आहे. सकारात्मक अनुभव येईल.

मीन-
नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल.मात्र, सहकारी वर्गाची साथ राहील. त्यामुळे कामाचा ताण जाणवणार नाही. घरी पाहुणे मंडळी येतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. – मनोबलाच्या जोरावर अनेक कामे पूर्ण करणार आहात. प्रवास सुखकर होतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. सार्वजनिक कामात तुमचा सकारात्मक सहभाग असणार आहे.व्यवसाय सुरू करण्याचा किंवा गुंतवणूकदारांचा शोध घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. आज विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी घरापासून दूर जावे लागेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर काम बिघडेल.
हे राशि भविष्य नाव राशिच्या अनुसार आहे की जन्म राशि अनुसार?
Astrologist विशेषज्ञ ज्योतिषांचे म्हणणे आहे की, दैनिक राशि भविष्य जन्म राशी अनुसार पाहणे उत्तम राहील. जर तुम्हाला आपली जन्म राशी माहिती नसेल तर तुम्ही आपल्या नाव राशीच्या अनुसार ही आपले भविष्य पाहू शकतात. जुन्या काळात तसे ही “नाव” हे राशीच्या हिशोबानेच ठेवले जात होते. बऱ्याच पंडितांचे मानणे आहे की, नाव राशी, जन्म राशीच्या बरोबरच महत्वपूर्ण आहे.
माझी रास काय आहे – कसे जाणून घ्यावे?
जर तुम्हाला आपली राशि माहिती नाही किंवा आपली राशि तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे तर, तुम्ही Astrologistच्या राशि कॅलकुलेटरचा https://www.drikpanchang.com/utilities/horoscope/hindu-moonsign-calculator.html वापर करून आपल्या राशीने जाणून घेऊ शकतात. आपली राशि जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या जन्म तारखेची गरज पडेल. राशि कॅलकुलेटर ने न फक्त तुम्ही राशि जाणून घेऊ शकतात तर आपले नक्षत्र, कुंडली, ग्रह स्थिती व दशा इत्यादी खूप काही जाणून घेऊ शकतात.