ह्या तीन राशी होणार मालामाल |weekly horoscope in marathi

१५ डिसेंबर ते २१ डिसेंबर या सप्ताहाचे राशिभविष्य

दैनिक राशि भविष्य (weekly horoscope in marathi)

आजच्या राशि भविष्य मध्ये आपल्याला आजच्या दिवसात आपणास कुठल्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे आणि कुठल्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे या विषयी माहिती देते. काय आजचा दिवस तुमचा प्रगतीपथावर नेईल की, आपल्या समोर बाधा उभी करू शकते. हे जाणून घेण्यासाठी चला, तर मग पाहूया काय म्हणतात आपले तारे!

प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो, आजचा तुमचा दिवस तुमच्या मनासारखा जाण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार का हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे ज्योतिषशास्त्र अभ्यासकांकडून तुमचा आजचा दिवस कसा हे राशीभविष्यच्या (weekly Horoscope ) माध्यमातून सांगितलं जातं.

मेष रास

सप्ताहाची सुरूवात अतिशय चांगल्या  गोष्टीनी  होईल. रविवारी आर्थिक कामे होतील . कौटुंबीक सौख्य मिळेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी व चित्रकार यांच्यासाठी काळ चांगला  आहे. सप्ताह मध्ये  जागेच्या कामांसाठी अनुकूल आहे. घरात छान वातावरण असेल. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना कालावधी खूप चांगला आहे. काही लाभही होण्याची यादरम्यान शक्यता आहे. नंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभात सामील होण्याचे योग येऊ शकतात.

 उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.

दैनिक राशि भविष्य (weekly horoscope in marathi

वृषभ रास

सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची साथ मिळेल. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सूर जमलेला असेल. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. लेखक, प्रकाशक यांना विशेष अनुकूल कालावधी आहे. एखादी चांगली बातमी ऎकायला मिळेल. सप्ताह मध्यात गायक, कलाकार व वक्त्यांना चांगला काळ आहे. तुमच्या छंदासाठी जरुर वेळ द्या. प्रवासाचे योग लाभतील . कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. घरातील दुरुस्ती किंवा अन्य थांबलेल्या  कामांसाठी वेळ काढावा लागेल. गूढ विषयांमध्ये मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी ग्रहमान संमिश्र आहे.

 उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.

दैनिक राशि भविष्य (weekly horoscope in marathi|tomorrow horoscope in marathi)

मिथुन रास

 सप्ताहाच्या सुरुवातीला बोलण्यावर संयम ठेवावा लागेल जोखीम असलेल्या कामांपासून लांब रहा. कोणालाही विनाकारण दिलेला सल्ला या काळात त्रासदायक ठरु शकेल. मात्र नृत्यकलेशी संबंधितांना हा कालावधी छान जाईल. पूर्वी केलेला एखादा खर्च आता अचानक लाभ देऊन जाईल. सप्ताह मध्यात मिष्टान्न खायला मिळतील. मन प्रसन्न असेल. कुटुंबामधील वातावरण चांगले असेल. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी शेजारी तसेच नातेवाईकांचा चांगला अनुभव येईल. या काळात केलेले प्रवास आनंद देणारे ठरतील. . खर्च वाढतील. आरोग्याच्या काही समस्याही जाणवतील.

उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.

कर्क रास

सप्ताहाच्या सुरूवातीला मनाला आनंद देणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. काही लाभही होतील. चांगली खरेदी कराल. अती दगदग मात्र टाळावी. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक प्रगतीसाठी  प्रयत्न करणाऱ्या लोकांना चांगला कालावधी आहे. घरातील वातावरण आनंदी असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. गृहसौख्य लाभेल. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत.

या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.

दैनिक राशि भविष्य (weekly horoscope in marathi|tomorrow horoscope in marathi)

सिंह रास

सप्ताहात सुरुवातीला वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताहाच्या  मधले दिवस  उत्तम राहतील . आर्थिक यश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागून राहील.  परदेशासंबंधी ज्यांचा व्यवसाय आहे अशा लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जयघोष  या काळात जरुर करावा.

कन्या रास

कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. कलेच्या संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. काहींना धनलाभ संभवतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी आयात-निर्यात करणार्‍या व्यापार्‍यांना अनुकूल काळ आहे. मात्र या दरम्यान बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. रविवारी भाग्याची साथ मिळेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.

उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.

दैनिक राशि भविष्य (weekly horoscope in marathi|tomorrow horoscope in marathi)

तूळ रास

सोमवार व मंगळवारी मनासारखे काम झाल्याने खुश असाल. सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची झाली तरी सुद्धा नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. आपले आरोग्य सांभाळा. कौटुंबिक सुख  लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाचा मध्य उपासना करणार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घडतील. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी जुने मित्र भेटण्याची शक्याता आहे. कलाकारांना तसेच शिक्षणाशी संबंधित लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. काही लाभ जीवनात  आनंद देतील.

उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.

वृश्चिक रास

सोमवार आणि मंगळवार हे  दिवस ज्योतिषी ,विमाप्रतिनिधी, मानसोपचारतज्ञ यांना अनुकूल आहेत. काहींना अचानक लाभाचे योग संभवतात. दुसर्‍यांच्या चुका दाखविण्याची तसेच स्पष्ट बोलण्याची सवय त्रासदायक ठरु शकेल. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासाचे बेत ठरतील. सासरकडच्या लोकांबाबत चांगली बातमी कळेल. वेळ मजेत जाईल.  सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांची मर्जी चांगली असेल. मन प्रसन्न असेल. रविवारी जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यां चांगला कालावधी आहे.

उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.

दैनिक राशि भविष्य (weekly horoscope in marathi|tomorrow horoscope in marathi)

धनु रास

फलादेश- या सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना ग्रहमान अनुकूल आहेतब्येत मात्र यादरम्यान जपायला हवी. सप्ताहाचा मध्य संमिश्र आहे. खर्च वाढतील. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता असेल. आयात-निर्यात करणार्‍या व्यापार्‍यांना मात्र अनुकूल दिवस आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. ज्योतिषशात्र, रेकी, कुंडलिनी जागृती अशा विषयांकडे मनाचा ओढा असेल. सप्ताहाच्या शेवटी परदेशप्रवासासाठी अनुकूल ग्रहमान आहे. . धनलाभ होतील. मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी देवाच्या जपात  मन रमवा.

उपासना: रामरक्षेचे पठण या काळात जरुर करावे.

मकर रास

आवडत्या माणसांबरोबर मस्त मजेत वेळ जाईल. कलाकारांना दिवस अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदार लोकांसाठी चांगले आहेत. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सर्दी/ सायनसचा त्रास असेल तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना फायदेशीर कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग संभवतात. गूढ विषयांमध्ये मन रमेल. एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन फायदेशीर ठरु शकेल. रविवारचा दिवस चांगला आहे.

उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.

दैनिक राशि भविष्य (weekly horoscope in marathi|tomorrow horoscope in marathi)

कुंभ रास

सप्ताहाच्या सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेलआर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य लाभदायक आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळण्याची शक्यता असेल . प्रेमासाठी  अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल. व्यापार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे. . तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

उपासना: विष्णू नामाचे पठण या काळात जरुर करावे.

मीन रास

रविवारी आवडत्या लोकांचा  सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभ होतील. त्यानंतरचे दोन दिवस मनोबल उत्तम राहील. प्रवास लाभदायी ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. गुरु किंवा त्या सारख्या  व्यक्तीच्या भेटीचे योग शक्य. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. एखादी शाबासकी किंवा कौतुकाची मिळालेली थाप, बक्षिस सुखावून टाकणार आहे . धनलाभही या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. ज्यांची कर्जप्रकरणे प्रलंबीत आहेत त्यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. संपूर्ण सप्ताह चांगला आहे. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीसाठी चांगले आहेत.

उपासना: गणपती देवाचे नाम स्मरण करावे .

दैनिक राशि भविष्य (weekly horoscope in marathi|tomorrow horoscope in marathi)

हे राशि भविष्य नाव राशिच्या अनुसार आहे की जन्म राशि अनुसार?

Astrologist विशेषज्ञ ज्योतिषांचे म्हणणे आहे की, दैनिक राशि भविष्य जन्म राशी अनुसार पाहणे उत्तम राहील. जर तुम्हाला आपली जन्म राशी माहिती नसेल तर तुम्ही आपल्या नाव राशीच्या अनुसार ही आपले भविष्य पाहू शकतात. जुन्या काळात तसे ही “नाव” हे राशीच्या हिशोबानेच ठेवले जात होते. बऱ्याच पंडितांचे मानणे आहे की, नाव राशी, जन्म राशीच्या बरोबरच महत्वपूर्ण आहे.

माझी रास काय आहे – कसे जाणून घ्यावे?

जर तुम्हाला आपली राशि माहिती नाही किंवा आपली राशि तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे तर, तुम्ही Astrologistच्या राशि कॅलकुलेटरचा https://www.drikpanchang.com/utilities/horoscope/hindu-moonsign-calculator.html वापर करून आपल्या राशीने जाणून घेऊ शकतात. आपली राशि जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या जन्म तारखेची गरज पडेल. राशि कॅलकुलेटर ने न फक्त तुम्ही राशि जाणून घेऊ शकतात तर आपले नक्षत्र, कुंडली, ग्रह स्थिती व दशा इत्यादी खूप काही जाणून घेऊ शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

आपल्या माहितीसाठी :-